जीवन त्यांना कळले हो -----
काल पुण्याला काही कामानिम्मित गेलो होतो येताना स्वारगेटला पुणे अर्नाळा हि बस मिळाली ,गाडीला बऱ्यापैकी गर्दी ,मी सीटवर बसलो एवढ्यात एक तरुण आणि अत्यंत देखणे जोडपे बरोबर खांद्यावर २ -२.५ वर्षाच त्या जोडप्याला शोभेल अस देखण पिल्लू .घामपुसत मंडळी स्थानापन्न झाली .माझ्या उगीचच मनात आले हे नेहमी वोल्वो अगर स्वतःच्या गाडीने जाणारे जोडपे आज या गाडीत कसे ?काही काही चेहरेच असे असतात कि त्यांना पाहताच आपल्या उगीच मनात येते ये लालडब्बा वाली जोडी नही,किवा रास्तेमे वडापाव खानेवाले नही है .
कंडक्टरने तिकीट विचारल्यावर लक्षात आले कि हि जोडी मोनी आहे .मी ठाणे तिकीट काढल्यावर त्याने कंडक्टरला माझ्याकडे बोट दाखवून मलापण दोन ठाणे असे सुचवले ,कंडक्टर खेकसला मग बोला कि ,त्यावर कंडक्टर पाहून तो मदनाचा पुतळा असा म्हणजे आपण "काय बस काय राव ,काय खेचता ?"असे म्हणताना हसतो ना ,तितका सहज गाळ्याकडे बोट दाखवत हसला .त्यात कुठे त्रागा नाही ,देवाला/दैवाला दोष देण नाही,सहानुभूतीची अपेक्षा नाही.या हस्यातच मी पार विरघळून गेलो आणि या जोडीशी संवाद व्हायला हवा अशी अंतरात्मा मला साद घालू लागला .
किती उकडतंय ?खुण करून तो मला म्हणाला व थंड पाण्याची बाटली काढून माझ्या समोर धरली .
प्या ,घोटभर ,त्याची खुण.एवढयात तो पाणी पीत असताना त्याच्या पत्नीने कमरेला खोचलेला रुमाल काढून त्याच्या चेहऱ्यावरील घाम टिपला व त्याचे कुरुळे केस हाताने सारखे केले .
मग तर या जोडीने माझा ताबाच घेतला व आमचा मुक संवाद चालू झाला .
मी --[अर्थात खुणेने व बरोबर तोंडाने बोलून ] हे जन्मजात मुकेपण का ?
तो --आमच्या मातोश्रींनी गरोदरपणात काहीतरी खाल्ल असेल .गरोदरपणाची खुण बायकोच्या पोटावर एक कंस काढून दाखवले मला हसू आवरेना ,एवढयात सौ नी संभाषणात भाग घेतला व एकंदर तिने हसत हसत केलेल्या खुणा मधून "बर झाल ,थ्यांक यु ,सासुबाई ,हा असा झाला म्हणून मला मिळाला ."हे बोल मला स्वच्छ ऐकू आले .
मी विचारले लव्ह कि अर्रेंज ?या खुणा करताना मलाही घाम फुटला पण माझ्या शेजारी एक सरदार बसला होता,म्हणून मी स्वतःच घाम पुसला .

तिने बदामाची खुण केली व आपल कोपर त्या बाणा सारख त्याच्या पोटात खुपसल.
मग तो सांगायला लागला,नाही हो हिचा बाप [हे म्हणताना माझ्या एक लक्षात आले ,सासरया बद्दल बोलताना माणूस मुका असो वा बोलका असो भाव एकच प्रकारचे येतात ].आधी विरोध करीत होता मी त्यांच्या पेक्षा थोडा गरीब म्हणून,पण मी हिला पळवली .
एकंदर बोलण्यातून हि मंडळी बडे खानादानवाली पण वेगळ बिऱ्हाड थाटलेली होती .तो इंजिनिअर होता व ती संस्कृत घेऊन एम .ए .झाली होती .मी मनातल्या मनात हात जोडले .एवढयात मला डुलकी लागली ,लोणावळ्याचा धाबा येताच त्याने मला उठवले व झोपता काय ?चला चहा प्यायला असे फर्मान सोडले .

मगा पासून माझ्या डोक्यात एकच थैमान देवाने त्या पिल्लावरही अन्याय केला असेल का?
हे मी विचारण्यासाठी धैर्य गोळा करीत होतो तेवढ्यात तिच्या मांडीतील ते कौतुक चुळबुळ करून बाबा बाबा करून रडू लागले .माझ्या चेहऱ्यावरील प्रश्न त्या स्वराच्या [तिचे नाव त्याने स्वरा ठेवले होते,जणू हे नाव ठेऊन घशातून न उमटणाऱ्या व्यंजनांना त्याने फाट्यावर मारले होते ]लक्षात आला आणि मग तिघांच्या म्हणजे स्वरा ,मी आणि पिल्लू डोळ्यात अश्रू उभे राहिले ,माझ्या डोळ्यातील अश्रू देवाची मानसपूजा करीत होते ,तिचे डोळे आनंदाने रडत होते ,आणि पिल्लू आईच्या छातीला झोंबायला ,भुकेने रडत होते .
जवळ जवळ ३ तास आमच्या गप्पा झाल्या ,मला एक मस्त पुतण्या आणि सुनबाई मिळाली ,त्या दोघांच्या खुणा मधून त्यालाही कोणीतरी वडीलधारा मिळाल्याचा आनंद होता .
जवळ जवळ ३ तास आमच्या गप्पा झाल्या ,मला एक मस्त पुतण्या आणि सुनबाई मिळाली ,त्या दोघांच्या खुणा मधून त्यालाही कोणीतरी वडीलधारा मिळाल्याचा आनंद होता .
त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्या दिवशी जोडी पाया पडण्यासाठी माझ्या घरी येणार आहे .
प्रश्न पडलाय मला एवढा आनंद देणाऱ्या सुनबाईची ओटी त्या दिवशी कुठल्या आशीर्वादाने भरू ?
खूप सुंदर....
ReplyDelete